आभाळ भरून आलं आहे....भुरभुरायलाही सुरुवात झालीय काही ठिकाणी.....झाडं तरारलीयेत
पाखरं भरारलीयेत...हृदयाच्या कुपीत मृद्गंध भरू पाहणा-या तरूणाईला, कवीमनांना किती प्रसन्न... आल्हाददायक वाटतंय म्हणून सांगू...! आसुसलेत सगळे थेंबांचे मोती झेलायला....पण जिकडे तिकडे डोक्याला हात लावून बसलाय आमचा शेतकरी राजा...सोन्यासारखा पिवळा झालेला गहू सोंगायचा बाकी आहे अजून शेतात...हरभरा सोंगून पडलाय
पण थप्पी घालायचीय त्याची अजून...सूर्यफुलाचा ढिग करून ठेवलाय हसत हसत, पण थ्रेशरवाला आज आज उद्या उद्या करतोय मळणी करायला...पाखरं हाकलून हाकलून राखलेली शाळू थरारतेय ढगांचा गडगडाट ऐकून...भाव कमी असला तरी फरदडीतून किमान घरखर्च तरी भागेल या आशेनं उभी ठेवलेली कपाशी वाचव वाचव म्हणत झुकली आहे धरणीमातेच्या पायांशी जोरदार वादळाच्या चाहुलीनं... ऐन हुरड्यात असलेल्या हिरव्यागार मक्याची गाळण उडालीय भुईसपाट करणा-या गारपिटीच्या भितीनं.... कधी नव्हे तो फांदोफांदी मोहरलाय शेतातला आंबा..... विहिरीत मेहबानी करून झिरपणा-या पाण्यावर वीजमंडळाच्या विश्वासघातकी भारनियमनाच्या वेळापत्रकासोबत लपंडाव खेळत तळहातावरच्या फोडासारखी जपलेली पिकं एका क्षणात नष्ट झालीत तर करायचं??? कर्जाचा डोंगर कसा पार करायचा??? मुलाचं शिक्षण.. मुलीचं लग्न कसं करायचं??? बायको कशी काळीठिक्कर झालीय वठलेल्या झाडासारखी शेतात राबून राबून.....
पावसा, तुला थोपवणं तर शक्य नाहीच; पण येणारच असशील तर हळुवार ये रे बाप्पा, वावधन घेऊन येऊ नकोस सोबत... शेतातलं पीक पाहून बळीराजाच्या मनात बहरलेल्या स्वप्नाची वाताहत करू नकोस राजा... त्याच्याही ओठांवर फुलू दे तुझ्या आगमनाची एखादी आल्हाददायक कविता!!!
~ राजीव मासरूळकर