तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
आपल्याला मिळालेला असेल
एक नवा निर्मळ जन्म
आपल्या अवतीभवती असेल
नवं आभाळ असलेलं एक नवं चकचकित जग
ज्यात आपण घेऊ शकू
निर्भेळ मनमोकळा श्वास
गळून पडले असतील सगळे
गळ्याभोवती आवळलेले जुने फास
या महिनाभराच्या तपश्चर्येत
मनाच्या डोहात विहरताना
लागलेले असतील आपल्या हाती
काही नवे ठाक
उतरलेली असेल
आपल्या डोळ्यांवरची कृत्रिम झाक
म्हणूनच
आता आपण जेव्हा भेटू
तेव्हा एकदम नवे असू
चेह-यावर असेल हवेहवे हसू
झाडं असतील टाळ्या
आपल्यासाठी वाजवत
पक्षी असतील आपलंच
विजयगान गात
निर्विकार झालो असूत
जगासारखे आपण
गेला असेल ग्रीष्म निघून
आला असेल श्रावण
नात्यांच्या प्रेमसरींत
चिंब भिजत राहू
अशा सुंदर जगाचेच
स्वप्न सतत पाहू
तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
नव्या आभाळाच्या नव्या जगात
नवा जन्म लाभलेले आपण
बदलू जुन्या जगाचे धोरण
बांधू नव्या युगाचे तोरण!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.28 मार्च, 2020
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
आपल्याला मिळालेला असेल
एक नवा निर्मळ जन्म
आपल्या अवतीभवती असेल
नवं आभाळ असलेलं एक नवं चकचकित जग
ज्यात आपण घेऊ शकू
निर्भेळ मनमोकळा श्वास
गळून पडले असतील सगळे
गळ्याभोवती आवळलेले जुने फास
या महिनाभराच्या तपश्चर्येत
मनाच्या डोहात विहरताना
लागलेले असतील आपल्या हाती
काही नवे ठाक
उतरलेली असेल
आपल्या डोळ्यांवरची कृत्रिम झाक
म्हणूनच
आता आपण जेव्हा भेटू
तेव्हा एकदम नवे असू
चेह-यावर असेल हवेहवे हसू
झाडं असतील टाळ्या
आपल्यासाठी वाजवत
पक्षी असतील आपलंच
विजयगान गात
निर्विकार झालो असूत
जगासारखे आपण
गेला असेल ग्रीष्म निघून
आला असेल श्रावण
नात्यांच्या प्रेमसरींत
चिंब भिजत राहू
अशा सुंदर जगाचेच
स्वप्न सतत पाहू
तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
नव्या आभाळाच्या नव्या जगात
नवा जन्म लाभलेले आपण
बदलू जुन्या जगाचे धोरण
बांधू नव्या युगाचे तोरण!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.28 मार्च, 2020
No comments:
Post a Comment