Thursday, 2 April 2020
Tuesday, 31 March 2020
कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग
कोरोनाच्या सावटाखालचं सैरभैर जग
मी घरातच आहे.
मी निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे.
मी उठतो. बसतो. चालतो. डोलतो. कधी गादीवर, कधी सोफ्यावर लोळतो.
कित्तीही कंटाळा आला तरीही घराबाहेर पाऊल टाकत नाही.
मी टीव्ही लावतो. (त्यासाठी बायको व मुलांसोबत लढावं लागलेलं असतं.) न्युज चॅनलवरचा ब्रेकिंग न्युजचा भडिमार बघतो. राज्याचे, देशाचे, जगाचे कोरोनाबाधितांचे वाढते आकडे बघून घाबरतो. मला सोफ्यावरून खाली उतरावसं वाटत नाही. मी चॅनल बदलत राहतो. भाजीपाल्यासाठी, किराण्यासाठी गर्दी करणा-या, सकाळी मॉर्निंग वॉककरता बाहेर पडलेल्यांचा, घरात करमत नाही म्हणून सहज फेरफटका मारायला म्हणून गर्दी करणा-यांचा, मुंबईपुण्यात कोरोना वाढण्याच्या भीतीपोटी स्वत:ची गाडी घेऊन किंवा ओला-उबर मागवून खेड्याकडे निघालेल्या येड्यांचा मला जाम राग येतो. सोज्वल शिव्या हासडत मी कुस बदलतो. चॅनल बदलतो. ब्रेकमध्ये 20 सेकंदात हात धुण्याची सूचना आल्याबरोबर बेसिनकडे पळतो. हातावर डेटॉल घेऊन Suman M पद्धतीनं हात धुतो. सकाळपासून ओल्याच असलेल्या टॉवेलला पुन्हा हात पुसतो आणि टीव्हीसमोर येऊन बसतो. एखादा चित्रपट लावतो. गढून जातो त्यात. हसतो. खोकतो. नाक ओढतो. बोटांनी नाक साफ करतो. हाताकडे बघतो. घसाही खरखर करतोय. कपाळाला हात लावून बघतो. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? चिंताक्रांत होतो. बेसिनकडे धावतो. हात धुतो. नाक धुतो. पुन्हा हात धुतो. हात नाक टॉवेलला पुसतो. नाकही त्याच टॉवेलला पुसले म्हणून पुन्हा हात धुतो. हात पुन्हा त्याच टॉवेलला न पुसता घातलेल्या बर्मुडा चड्डीला पुसतो. टीव्हीसमोर येऊन बसत नाही तोच नाक गळतंय की काय असं जाणवतं. अंगठा व तर्जनीनं नाकपुडीतून काही बाहेर येतंय का ते तपासतो. फिक्कट पिवळा शेंबूड बोटांना लागतो. तो तसाच दोन्ही बोटांनी कुस्करतो. घट्ट होऊन त्याची लेंडी झाली की तशीच अंगठ्यावर घेऊन तर्जनीनं भिरकावतो. तितक्यात हात धुवायचा ब्रेक येतो. पुन्हा बेसिनकडे पळतो. मग मला आठवतं आपण नियोजनपूर्वक महिनाभराचं मेडिसीन व किराणा भरल्याचं. मी सर्दीची एक गोळी घेतो. एक चमचा कफसिरप घेतो. स्वत:ची तारिफ करत पुन्हा सोफ्यात बसतो. टीव्ही बोर झालेली असते. मग मी मोबाईल काढतो. Whats app वर क्लिक करतो. चीनमध्ये इतके, इटलीत तितके लोक मेल्याच्या, खबरदारी घ्यायला सांगणा-या पोस्ट वाचतो. घरात बसणारांवरचे, बाहेर पोलिसांचे फटके खाणारांवरचे , नवराबायकोवरचे विनोद वाचतो. हसतोही. मग इटलीतून मराठी माणसाचा मराठी माणसांना घरातच बसा म्हणून कळकळीची विनंती करणारा भीतीदायक व्हिडीओ पाहतो. आपण कोरोनानं मेलो आहोत आणि आपलं प्रेत उचलायलाही कोणी उरलेलं नाही असं दृश्य डोळ्यांसमोर येऊन मी थरथरायला लागतो. जवळच्या लोकांच्या चारपाच ग्रुपवर तो व्हिडीओ पाठवून मी त्यांना सतर्क करतो आणि न्युज चॅनल लावतो. लोक घराबाहेर फिरतच आहेत, पोलिस त्यांच्यामागे धावताहेत, ढुंगणावर फटके देताहेत असे मनोरंजक दृष्य पाहत बसतो. मग राज्याचे आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री मिडीयासमोर येतात. राज्यात किती रूग्ण दाखल आहेत, काय काळजी घेतली जात आहे, जनतेने काय दक्षता घ्यावी याबाबत माहिती देतात. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. ब्रेकिंग न्युजचा भडिमार सुरू राहतो. मला आठवतं टीव्ही मोबाईल पाहताना मी अनेकवेळा नाकाला, चड्डीला हात लावलाय. घशातली खरखर वाढत चाललीय. आता आपलं काही खरं नाही म्हणत पुन्हा बेसिनकडे पळतो. कफसिरप काम करत नाही तर मग काय करावं? बायकोला सांगावं का? नाही नकोच. तिची आवडती मालिका न लावता टीव्हीच्या रिमोटचा ताबा आपणच घेऊन अत्यंत निरंकुशपणे तिची इच्छा चिरडल्याच्या रागानं ती बेडवर जाऊन झोपलीय. नकोच तिला सांगणं म्हणत मी किचनकडे वळतो. मीठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या म्हणून लाईटरनं गॅस पेटवतो. हँडल ओढून किचनट्रॉलीतून छोटं पातेलं काढून गॅसवर ठेवतो. प्युअरेटच्या नळाची तोटी वर करून ग्लासभर पाणी घेऊन पातेल्यात ओततो. हँडल ओढत अलमारीतून मिठाचा डबा काढतो. चुकटीदोन चुकटी मिठ पातेल्यातल्या पाण्यात टाकतो. पुन्हा किचनट्रॉलीतून चमचा काढण्यासाठी हँडल ओढताना लक्षात येतं की बाप रे! किती वस्तुंना हात लावला आपण? यांच्यावर आधीच कोरोना विषाणू बसलेला असेल तर? बायको फार काही काळजी घेत नाही आपली. बोललं की अंगावर धावून येते अन् तुम्हीच का नाही करत म्हणून टोमणेही मारते. तिच्या हातावरूनही विषाणू या हँडल्सवर बसू शकतो. अरे हो... हे पाणी गरम करण्याच्या नादात मी नाकातोंडाला कितीवेळा हात लावला? बापरे... चिंता खायला लागते. मी किचनओट्याशेजारच्या नळाखाली हात धुतो. ट्रॉलीतून सांडस घेऊन गॅस बंद करत पातेल्यातलं पाणी ग्लासात ओततो. गॅलरीत जाऊन इकडेतिकडे बघत गुळण्या करतो. किती मोकळी हवा आहे बाहेर! अहाहा! व्वा... एकदा यावं का बाहेर फेरफटका मारून? पाच वाजलेत. ऊनही उतरलं. किती लोक फिरताहेत बिनबोभाट बाहेर? आपणच काय कुणाचं घोडं मारणार आहोत असा विचार करत रूमालाला हात पुसतो. कोरोनाचा विचार पिच्छा सोडत नाही हे लक्षात घेऊन रूमालासह हॉलमध्ये येऊन पुन्हा सोफ्यात बसतो. मोबाईलवर फेसबुक उघडतो. सगळीकडे करोनाच करोना. करोनावरच्या विनोदी पोस्ट, कविता, घराबाहेर पडणारांना मुर्खात काढून शिव्या हासडत परिस्थितीचं गांभिर्य समजावून सांगत घरातच गपगुमान बसण्याची धमकीवजा विनंती करणा-या पोस्ट्स, मोदीचं गुणगान गाणा-या, मोदीला येड्यात काढणा-या पोस्ट स्क्रोल करत जातो. लाईक केलेल्या लोकसत्ता, लोकमत, सकाळ वगैरे पेजेसवरील ताज्या बातम्या डोळ्यांसमोर येत जातात. इटलीत एका दिवसात 800 पेक्षा जास्त लोक मेलेत. प्रेतं गाडीत सरपणासारखे रचून नेले. चिनपेक्षा अमेरिकेत कोरोना जास्त पसरलाय. मोदींनी 21 दिवस भारत लॉकडाऊन केलाय. फेरफटका मारायला घराबाहेर पडला आणि पोलिसांनी त्याची अशी जिरवली. पोरानं बापाचा मृतदेह मोटरसायकलवरून नेऊन केले अत्यंसंस्कार. लॉकडाऊनचा फायदा घेत सोळावर्षीय विद्यार्थीनीवर 10 जणांचा आळीपाळीनं बलात्कार. जमावबंदी असूनही अमुक ठिकाणी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले नागरिक: गुन्हे दाखल. लॉकडाऊनचा फायदा घेत 60 वर्षाच्या आजीवर बलात्कार करू बघणा-याच्या जिभेचा आजीने पाडला तुकडा, काळाबाजारीसाठी नेत असलेल्या कोट्यावधी किंमतीच्या मास्कचा साठा जप्त. कुण्या रविशंकरचा मृतदेह उचलायला कोणीच न आल्यानं शेजारच्या मुस्लिम बांधवानी त्याची अंत्ययात्रा काढत केले अंतिमसंस्कार. अमुक अभिनेत्री कोरोनाग्रस्त - बॉलीवुड व राजकीय वर्तुळात खळबळ. फलान्या गावात भरदिवसा ट्रॅक्टरमधील धान्य व पीठाच्या गोण्यांची जमावाकडून लूट. बापाने अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेत खांद्यावर नेत केले अंत्यसंस्कार. अमुकटमुक हॉस्पिटलमधून कोरोग्रस्त रूग्णाचे पलायन- शोधाशोध सुरू, मुलाच्या 13व्याला आईने केले मोफत 2000 मास्कचे वाटप, घरातच बसा असे सांगणा-या पोलिसांवर केला गावक-यांनी हल्ला - गुन्हे दाखल. कंपन्या बंद केल्यानं, बांधकामं बंद केल्यानं रोजगार नसलेले शेकडो मजूर कामगार निघाले पायीच घराकडे. खायलाप्यायला काहीच मिळत नसतानाही गावी जाण्यासाठी हजारो मजूर उपाशीपोटी उतरले रस्त्यावर. शेकडो किमी पायी प्रवास. लॉकडाऊनची ऐसी की तैसी. संसर्ग पसरण्याचा वाढला धोका. इंग्लंडचे प्रिन्स , इंग्लंडचे पंतप्रधान व आरोग्यमंत्रीही करोनापॉझिटीव्ह. बारामतीत शेकडो प्रवाश्यांना सोडणा-या रिक्षाचालकाला झाला कोरोना, लोकांनी घरातच बसावे म्हणून रामायण, महाभारत, स्वराज्यरक्षक संभाजी, शक्तिमान या मालिका पुन्हा सुरू. ट्रक, टँकरमध्ये जनावरांसारखे कोंबून अनेक मजूरांचा विनापरवाना प्रवास सुरूच, राज्यावर कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाच्या भितीने जर्मनीतल्या अर्थमंत्र्याची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे दारू प्यायला मिळत नाही म्हणून केरळमध्ये पाच तळिरामांची आत्महत्या, घरातला कर्ता माणूस गेल्यावर चार खांदे न मिळाल्यांनं दोन दिवस घरातच पडून कुजलेल्या प्रेतावर ग्रामसेवकाने केले अंत्यसंस्कार, दिल्लीत स्टेशनसमोर हजारो परप्रांतीय घरी जाण्यासाठी ताटकळले, आधीच संकटात असलेल्या शेतक-यांना अवकाळी पावसाचा फटका, संत्री-द्राक्षांच्या बागांचं मोठं नुकसान, कलिंगडं उचलायला मजूर मिळेना, सोंगणी करून पडलेला गहू भिजला, लाखो रूपये खर्च करून मेहनतीनं पिकवलेल्या पिकाला बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्थाच नाही. नेलं तर भाव नाही. कर्जबाजारी शेतकरी चिंताग्रस्त. कुण्या राज्यात पायी प्रवास करणा-या मजुरांना जंतुनाशकाने अंघोळ घालत केलं निर्जंतुकीकरण- सर्वत्र संतापाची लाट , मजुराला आपल्या दहा वर्षाच्या लेकराचा मृतदेह 88 किमी पायी चालत हातांवरच न्यावा लागला वाहून. गावक-यांनी गावात येण्याच्या सगळ्या सीमा केल्या बंद - स्थलांतरीतांची होतेय हेळसांड, नफेखोरी करणा-या दुकानदारांवर शासन करणार कारवाई. कोरोना विषाणू चिननेच निर्माण करून पसरवल्याचा अमेरिकेचा दावा, तिसरे महायुद्ध होणार? नागरिकांत नैराश्य पसरू नये म्हणून अमेरिकन यंत्रणेने नागरिकांना योग्य दक्षता घेत हस्तमैथुन करण्याची केली सूचना...... अशा एक ना अनेक बातम्या डोळ्यांसमोरून सरकत जातात. कोरोनाने मरणा-यांपेक्षा भुकेने, आजाराने मरणा-यांची संख्या जास्त असल्याचं लक्षात येतं.करोनानं मरणारे तर भाग्यवानच. शासकीय गाडी, अंब्युलंसतरी मिळते स्मशानभूमीपर्यंत. इतरांच्या प्रेतांची हेळसांड बघून, कामगार मजूरवर्गाचे हाल बघून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अश्रू गालांवर ओघळणार तोच मी ते हातातल्या रूमालानं पुसतो. पोटासाठी या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या गावातून त्या गावात स्थलांतरीत झालेल्या आणि आता मालकानं हाकलून लावल्यानं पुन्हा पोटासाठी गावाकडे पायीपायी निघालेल्या मजुरांच्या हतबलतेशी तादात्म्य पावण्याचा मी प्रयत्न करतो. कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाऊनच्या विळख्यात सुकलेल्या ओठांचं रक्ताळल्या पायांसह सैरभैर झालेलं त्यांचं विझुविझु झालेलं जग स्मरून मन विषण्ण होत जातं. गलबलून आल्यानं फुरफुरायला लागलेलं नाक मी रूमालानं पुसतो. घसा पुन्हा खरखरायला लागलाय हे पुन्हा माझ्या लक्षात येतं. मी हात धुवायला बेसिनकडे पळतो. एव्हाना बायको उठलेली असते. हात धुताना बायकोला लाडात हाक मारत आल्याचा चहा करायला सांगतो. "तुम्हीच करा. माझं ऐकता का काही? साधी आवडती मालिका बघू देत नाही मला...... " तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो तसा मी पुन्हा हॉलकडे पळतो. खरंच मला कोरोना तर झाला नाही ना? बायकोला आपली काडीचीही चिंता नाही म्हणत गुगलवर पुन्हापुन्हा कोरोनाची लक्षणं सर्च करत राहतो. कफ सिरप घेतो, कोमट पाण्याच्या गुळण्या करतो, आलं मिरी दालचिनी घालून उकळलेला चहा घेत राहतो. हळद टाकून दुध पीत राहतो. वारंवार हात धुत राहतो.
घरात सोशल डिस्टंसींग न पाळणा-या माझ्या मुलांवर मी वारंवार खेकसतो. बायकोसोबत वाद होणार नाही याची दक्षता घेतो. दररोज आपण आठदहा तास आणि मुलं सहासात तास घराबाहेर असताना तिला घरात असलेलं स्वातंत्र्य आता 24 तास सगळे घरीच असल्यानं हिरावल्या गेल्याचं समजून घेऊन अनेक दिवस असेच घरात काढावे लागणार आहेत हे लक्षात घेता मी प्रकरण सामोपचारानं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मुलांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणत्या वेळी कोणतं काम करायचं याचा टाईमटेबल बनवायला सांगतो. मुलं मोठ्या मेहनतीनं तो पक्षपातीपणे बनवतात. त्यात हस्तक्षेप करून मी खास वेळ व्यायाम, वाचन, बातम्या व बायकोच्या मालिकांसाठी राखून ठेवतो. सर्वांनी तो कटाक्षानं पाळावा याकडे लक्ष देतो. अर्थात तो पाळल्या जात नाहीच. थोडीफार धुसपुसही सुरू राहते. मी समेट घालत राहतो.
मी घरातल्या घरात धावतो. हलकासा व्यायाम करतो. बायकोमुलांत रमण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत चेस, कॅरम, चंफुल, अंताक्षरी... खेळतो. पुस्तकं वाचतो. जमेल तशी पुन्हापुन्हा टीव्ही पाहतो. लॉकडाऊनचं पालन न करणा-यांना साजुक शिव्या हासडत चरफडत राहतो. गावाकडे फोन करून आईवडिलांना, भावाबहिणींना, मित्रांना काळजी घेत कटाक्षानं घरातच रहायचं सांगतो. काही सकारात्मक बातम्याही येतात. मराठमोळ्या गर्भवती रणरागिणीने बनवली कोरोना चाचणी किट. अनेक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण निगेटिव्ह होऊन घरी रवाना. टाटांकडून तसेच अनेकांकडून भारत व राज्यसरकारला कोरोनाशी लढण्यासाठी कोट्यवधी रूपयांची मदत. कोरोनामुळे मरणारांची संख्या फक्त 2 ते 3 टक्केच! जरा बरं वाटतं. मी नाकाची, घशाची, माझ्या मुलांची काळजी घेतो. घरातल्या सगळ्या दारांच्या कडीकोंड्यांची डेटॉलच्या पाण्यानं वारंवार सफाई करतो. बायकोला कामात मदत करतो. व्हाट्सॅप, फेसबुक पाहतो. भारतासह जगभरातले कोरोनाग्रस्तांचे मृत्युंचे भराभर वाढणारे आकडे पाहत पॅनिक होत राहतो. हळहळतो.
माझी दाढी लोंबली आहे. डोक्याचे केस वाढले आहेत. घरच्या घरी दाढी करणं शिकून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं या विचारात मी दररोज काही मिनीटं घालवतो. ज्यांना ते येतं त्यांचा मला हेवा वाटतो. सुस्कारा सोडत मी दाढी वाढवून नवा लुक स्विकारण्याचं ठरवतो. जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. बेघरांसाठी प्रार्थना करतो. आहे त्या परिस्थितीत दिवस ढकलू लागतो.
बाहेर काहीही झालं तरी मी घरातच राहतो. मी जगावर आलेल्या या भयंकर संकटात एक सुजाण नागरिक बनून राहण्याचा, देशावर कोसळलेल्या या जीवघेण्या आपत्तीत देशाचा निस्सीम देशभक्त होण्याचा भाबडा प्रयत्न करत राहतो.
~ राजीव मासरूळकर

Saturday, 28 March 2020
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
आपल्याला मिळालेला असेल
एक नवा निर्मळ जन्म
आपल्या अवतीभवती असेल
नवं आभाळ असलेलं एक नवं चकचकित जग
ज्यात आपण घेऊ शकू
निर्भेळ मनमोकळा श्वास
गळून पडले असतील सगळे
गळ्याभोवती आवळलेले जुने फास
या महिनाभराच्या तपश्चर्येत
मनाच्या डोहात विहरताना
लागलेले असतील आपल्या हाती
काही नवे ठाक
उतरलेली असेल
आपल्या डोळ्यांवरची कृत्रिम झाक
म्हणूनच
आता आपण जेव्हा भेटू
तेव्हा एकदम नवे असू
चेह-यावर असेल हवेहवे हसू
झाडं असतील टाळ्या
आपल्यासाठी वाजवत
पक्षी असतील आपलंच
विजयगान गात
निर्विकार झालो असूत
जगासारखे आपण
गेला असेल ग्रीष्म निघून
आला असेल श्रावण
नात्यांच्या प्रेमसरींत
चिंब भिजत राहू
अशा सुंदर जगाचेच
स्वप्न सतत पाहू
तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
नव्या आभाळाच्या नव्या जगात
नवा जन्म लाभलेले आपण
बदलू जुन्या जगाचे धोरण
बांधू नव्या युगाचे तोरण!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.28 मार्च, 2020
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
आपल्याला मिळालेला असेल
एक नवा निर्मळ जन्म
आपल्या अवतीभवती असेल
नवं आभाळ असलेलं एक नवं चकचकित जग
ज्यात आपण घेऊ शकू
निर्भेळ मनमोकळा श्वास
गळून पडले असतील सगळे
गळ्याभोवती आवळलेले जुने फास
या महिनाभराच्या तपश्चर्येत
मनाच्या डोहात विहरताना
लागलेले असतील आपल्या हाती
काही नवे ठाक
उतरलेली असेल
आपल्या डोळ्यांवरची कृत्रिम झाक
म्हणूनच
आता आपण जेव्हा भेटू
तेव्हा एकदम नवे असू
चेह-यावर असेल हवेहवे हसू
झाडं असतील टाळ्या
आपल्यासाठी वाजवत
पक्षी असतील आपलंच
विजयगान गात
निर्विकार झालो असूत
जगासारखे आपण
गेला असेल ग्रीष्म निघून
आला असेल श्रावण
नात्यांच्या प्रेमसरींत
चिंब भिजत राहू
अशा सुंदर जगाचेच
स्वप्न सतत पाहू
तर
या महिनाभराच्या तपश्चर्येनंतर
नव्या आभाळाच्या नव्या जगात
नवा जन्म लाभलेले आपण
बदलू जुन्या जगाचे धोरण
बांधू नव्या युगाचे तोरण!
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.28 मार्च, 2020
Friday, 27 March 2020
कोरोना संकटाचे जीवनशैलीवर होऊ शकणारे दीर्घकालीन परिणाम
कोरोना विषाणूचे जागतिक संकट लक्षात घेऊन वेगवेगळ्या खबरदा-या जागतिक स्तरावर घेण्यात येत आहेत. हे संकट निवळल्यानंतर त्याचे जागतिक (विशेषत: भारतीय) जीवनशैलीवर होणारे काही सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय परिणाम नक्कीच दिसून येतील. त्यातील काही शक्यता पुढीलप्रमाणे असू शकतील :
1)नेहमी घराबाहेर फिरणा-या लोकांना घरात बसून राहण्याची, घरात अधिक वेळ घालवण्याची सवय लागू शकते.
2)लोकांचा धर्मसंस्थेवरील विश्वास कमी होऊ शकतो. प्रार्थनास्थळे व धर्मस्थळांच्या भेटी, सहलींत घट होऊ शकेल. अशा ठिकाणी भरणा-या यात्रांच्या गर्दीत दरवर्षी घट होत जाईल. धार्मिक स्थळांच्या जागतिक पर्यटनावरही परिणाम होईल. जगावर आपली पकड निर्माण करण्यासाठी धर्मसंस्था वेगवेगळे उपाय योजत पुन्हा सक्रीय होईल आणि भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुखाचे दाखले देत यशस्वीही होत राहिल.
3)मास्क हा दैनंदिन जीवनाचा भाग होईल. पुरूषांमध्ये कदाचित याची फॅशनही येईल. गर्दीच्या ठिकाणी पुरूष मास्क लावून (व महिला नेहमीप्रमाणे स्कार्फ बांधून) फिरताना दिसतील. दवाखान्यांत मास्क घालून येणारांणाच प्रवेश दिला जाण्याचा निर्णय अनेक ठिकाणी घेतला जाईल. मास्क निर्मिती करणा-या कंपण्यांना चांगले दिवस येतील. कदाचित पुरूषांच्या पेहराव्याची फॅशन बदललेली असेल.
4)घरोघरी बाहेरून आल्याबरोबर हात धुण्याला प्राधान्य राहिल. ज्यांच्याकडे वाशिंगमशीन आहे त्यांना बाहेरून आल्याबरोबर कपडे धुवायला टाकण्याची सवय लागेल व पुढे ती एक प्रथाच होईल. सॅनिटायझर्सच्या कंपन्यांची भरभराट होईल. दवाखान्यांत प्रवेशद्वाराजवळच हँडवॉश स्टेशन उभारले जातील. घर, शाळा, प्रार्थनास्थळांवरही ही व्यवस्था प्रवेशद्वारांवरच असेल. स्मशानभूमीवरही ही व्यवस्था राहिल. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवली जाईल व त्यांची स्वच्छता हा प्राधान्याचा विषय होऊन जाईल.
5)Work from home हा कार्यसंस्कृतीचा एक भाग होऊन जाईल. घरी बसून करता येण्यासारख्या कामांचा शोध घेतला जाईल. या क्षेत्रात नव्या कंपन्या उतरतील. गंभीर आजारी कर्मचारी वगळता दीर्घ रजेवर जाणा-या कर्मचा-यांना कदाचित work from home ची अट घातली जाऊ लागेल.
6) Study from home या संकल्पनेला प्रोत्साहन मिळेल. Home schooling रूजू लागेल. बायजूस, वेदांतू, टॉपस्कोअरर यांसारख्या शैक्षणिक Apps चे पीक येईल आणि घरी बसून online शिकण्याचा खर्च खाजगी इंग्रजी शालेय खर्चाच्या कितीतरी पट कमी होईल.
7)लोकांची भेटतांना हातात हात घेण्याची, मिठी मारण्याची, मित्रांच्या घरी सहपरिवार जाऊन यथेच्छ गप्पा मारण्याची सवय कमी होत जाईल. कुणाच्या घरी मुक्काम करणे नामशेष होत जाईल. लग्नकार्यात होणारी गर्दी घटत जाईल. रजिस्टर पद्धतीचे लग्न, एका दिवसात विवाह यांचे प्रमाण वाढू लागेल.
8)वर्षभरात एक दिवस 'Lockdown Day' (भारतात 22 मार्च) म्हणून पाळला जाऊ लागेल. प्रदुषण व पर्यावरणविषयक इतर जागतिक समस्यांवरील उपाययोजना म्हणून हे केले जाईल. भविष्यात प्रत्येक महिन्यात एक दिवस, त्यापुढेही जाऊन आठवड्याचा शनिवार किंवा रविवार Lock down करण्याच्या आवश्यकतेवर निश्चितच विचार होऊ शकेल. संकटकाळासाठी तर 'Lockdown' हा परवलीचा शब्द होऊन जाईल.
9)दुस-या महायुद्धानंतर अणवस्रांबाबत जागतिक पातळीवर जशी पावले उचलली गेली, तशीच पावले प्रयोगशाळेत विषाणुनिर्मिती करण्याबाबत उचलली जातील. तरीही काही देश राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत विषाणुनिर्मिती व त्यांच्या चाचण्या करत राहू शकतील.
10)देशावर आलेल्या आरोग्यविषयक भयावह महामारीसारख्या संकटकाळात वयोवृद्ध, गंभीर आजारी व बेवारस , भिकारी लोकांना मरू दिले जाणे शिष्टसंमत मानले जाईल .
11)युवाल नोव्ह हरारी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान वाढत जाईल. आपण बाळगत असलेल्या व आपल्या शरीरावर बसवलेल्या यंत्राद्वारे सरकार अथवा त्रयस्थ संस्थेकडे जमा होणा-या माहितीद्वारे देशाचा व जगाचा बाजार नियंत्रित केला जाऊ लागेल. देशाचे व जगाचे राजकारणही या माहितीद्वारे प्रभावित असेल. काही देश हुकुमशाहीकडे झुकू लागतील. गोपनियतेला सुरूंग लागत राहिल.
तर कोरोनाव्हायरसचं संकट टळल्यावर आपलं जग एकंदरीतच वरील बाबींसारखं बदलत जाईल असं मला वाटतं.
अर्थात या सगळ्या जरतरच्या बाबी असल्या तरी त्यातल्या काही निश्चितच ख-या ठरणा-या असू शकतात.
आपली काही खास निरीक्षणं असतील तर नक्कीच सुचवावीत.
~ राजीव मासरूळकर
औरंगाबाद
दि.27/03/2020

Tuesday, 24 March 2020
तुम्हीच ईश्वर आहात...
तुम्हीच ईश्वर आहात
हो, तुम्हीच
तुम्ही जन्माला आलात
आणि जन्माला घातलंत एक मोठं जग
मोह असो कि माया
तुम्ही वाढवलंत हे जग तनमनानं
मायबाप, नातीगोती, घरदार, पैसाअडका, कामधंदा, वगैरे वगैरे....
हे जग अनंत काळापर्यंत टिकून रहावं
म्हणून झटत आहात क्षणोक्षणी
तुमच्याकडेही आहे शिक्षणाचा तिसरा डोळा
किंबहुना माहितीतंत्रज्ञानाचा चौथा डोळाही
आता तुमच्या मुठीत आला आहे लिलया
फक्त या सगळ्यावर तुमचीच वक्रदृष्टी पडू नये
आणि सुरू होऊ नये सर्वत्र मृत्यूचं तांडव...
उत्पत्ती, स्थिती, लय तुमच्यातच आहे
बघा, तुम्हीच ईश्वर आहात...!
तुम्ही जनताजनार्दन
तुम्हीच गण आणि तुम्हीच आहात गणपती
पृथ्वीप्रदक्षिणा म्हणून आईवडिलांभोवती फेरी मारणारेही तुम्हीच तर आहात
तुमच्याकडे आहेत रिद्धी, सिद्धी आणि प्रखर बुद्धीही
कला आणि ज्ञानाचे भंडार तुम्हीच खुले करू शकणार आहात
काही दिवस घरात राहून तप:साधनेतून
सुखकर्ता... दुखहर्ता तुम्हीच आहात
तुम्ही ईश्वर आहात
संपूर्ण पृथ्वीवर प्रेम करून
तिचे रक्षण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे
तुम्हीच तर आणू शकता सर्वत्र रामराज्य वगैेरे
अचानक अवतरलेल्या बहुरूपी बहुशक्तीशाली महाभयंकर करोनारावणाने
तुमची सुख, शांती, प्राणरूपी सीता पळवून नेलेली आहे
तुमच्याच आत आत आत
तिचा तिथेच शोध घेत
स्वत:शीच युद्ध पुकारून रावणदहन केल्याशिवाय
कुठलाही उत्सव साजरा करायचा नाहीय तुम्हाला तुमच्या प्रजेसोबत
आणि हो, खबरदार
सीता आली तरी
तिच्या शालीनतेवर बोट ठेवणारे परीटही
असतीलच आजुबाजूला
म्हणून तिला द्यावी लागणार आहेच पुन्हा पुन्हा
अग्नीपरीक्षा
म्हणून आखून घ्या स्वत:भोवती लक्ष्मणरेषा
आणि स्वत:च्या कुटुंबासाठी शबरी व्हा काही दिवस
दिवाळी दूर नाहीच
फक्त विसरू नका, तुम्हीच ईश्वर आहात!
तुमच्यातच आहे भवतालाकडे दुर्लक्ष करणारा अंध धृतराष्ट्र
तुमच्यातच आहे दूरदृष्टी असलेला संजय
असंख्य जबाबदा-या पेलूनही प्रसंगी अब्रुहरण सहन करावं लागलेली
पांचालीही आहे तुमच्यातच
कधीही खोटं न बोलणारा खोटं न वागणारा
धर्मही तुम्हीच आहात
संभ्रमावस्थेतील अर्जूनही तुम्हीच
आणि करंगळीवर पर्वत उचलून
गोकुळाचं रक्षण करण्यापासून
जे घडतंय ते माझ्याच इशा-यावरून घडतंय
जे होईल तेही चांगलंच होईल
हे सांगणारा विराट कृष्णही तुमच्यातच आहे..
आता पुन्हा एकदा महाभारत घडू द्यायचं कि नाही
तुमचे हात तुमच्याच वंशवधाने मलीन होऊ द्यायचे की नाही
हे फक्त तुमच्याच हातात आहे...
तुम्हीच अल्लाह आहात, येशू, बुद्ध, महावीर,
गुरू आणि गुरूग्रंथ साहिब.....
सर्व तुम्हीच तर आहात
तुम्हीच आहात तुमचे तारणहार...
हो, तुम्हीच
तुम्हीच ईश्वर आहात!
राजीव मासरूळकर
दि.24/03/2020
सकाळी 08:00

Saturday, 21 March 2020
प्रयोगशाळा
जग आहे की
प्रयोगशाळा
प्रयोग चालू
येथ निरंतर
युद्ध येथली
अटळ व्यवस्था
पुराणवांगी
शिजती सत्वर
जाळ चाक घर
कुणी शोधले
कुणी बोलणे
घडवत गेले
ठरल्या व्याख्या
वस्तू सगळ्या
सगळे माझे
फुगे पिपासा
कुणी शोधला
ईश्वर अल्ला
कुणी घातली
भिती अनामिक
कुणी शोधले
विधी आगळे
दगडाला
देवत्व लाभले
कुणी सांगतो
शुन्यच सगळे
कुणी म्हणे फळ
पडते खाली
प्रेम करा रे
सांगत कोणी
परक्यांवर नित
द्वेष ओकतो
कुणी मंदिरे
बांधत फिरतो
कुणी कोरतो
सुंदर लेणी
कुणी जन्मतो
मुर्तीभंजक
अंती त्याचे
बनते थडगे
कुणी घडवतो
तगडे सैनिक
कुणी प्रसवती
गुणी खेकडे
ज्याच्या मागे
उभे घोळके
त्याची सत्ता
तत्व नागडे
कुणी शोधले
सोने मोती
कुणी राहिले
खोदत माती
कुणी शोधली
लिपी लाघवी
फुगवीत बसले
पोकळ छाती
कुरघोडी कर
कुरघोडी कर
कुणी शहाणा
सांगत सुटला
कुणी निघाला
जिंकत पृथ्वी
कुणी म्हणाले
माया सगळी
कुणी त्यागुनी
संसाराला
वनात गेले
स्वत:स शोधत
संसाराच्या
संसर्गावर
कुठे मिळाले
कुणास औषध
कुणी म्हणाले
जे आहे ते
सगळे सगळे
करुया सोपे
कुणी शोधला
पैसाअडका
कुणी बदलले
घरटे खोपे
मंत्र गळाले
तंत्र उगवले
युग अवतरले
घड्याळवेडे
यंत्रयुगाचा
मुखडा भोळा
विज्ञानाचे
त्यावर मुस्के
अणू मिळाला
अन् अजरामर
अणुयुद्धाचा
विध्वंसक ज्वर
कधी न शमला
जात, धर्म अन्
वर्णद्वेष या
पृथ्वीवरला
पृथ्वीचा रस
काढत चाखत
विकास भोगत
आला मानव
प्रयोग तिकडे
होतो आहे
चंद्र मंगळा
आता सावध
मुठीत आले
विश्व कुणाच्या
विश्व कुणाचे
विखरुन गेले
जितक्या भिंती
पाडुन झाल्या
नव्या तेवढ्या
उठल्या भिंती
प्रयोग आहे
सुरू निरंतर
कसे कुणाला
करू निरूत्तर
सरहद्दींचा
घेउन ठेका
कुणी होतसे
मानवतस्कर
माज यशाचा
करू साजरा
यातच आहे
जनहित मानू
शोधत राहू
सोडत राहू
शत्रुंवर नित
कैक विषाणू
हेच संक्रमण
पिढीत पुढच्या
पसरण्यास
वाढवूत शाळा
भविष्य मोठे
सुंदर आहे
फक्त अनुभवा
प्रयोगशाळा!
राजीव मासरूळकर
प्रयोगशाळा
प्रयोग चालू
येथ निरंतर
युद्ध येथली
अटळ व्यवस्था
पुराणवांगी
शिजती सत्वर
जाळ चाक घर
कुणी शोधले
कुणी बोलणे
घडवत गेले
ठरल्या व्याख्या
वस्तू सगळ्या
सगळे माझे
फुगे पिपासा
कुणी शोधला
ईश्वर अल्ला
कुणी घातली
भिती अनामिक
कुणी शोधले
विधी आगळे
दगडाला
देवत्व लाभले
कुणी सांगतो
शुन्यच सगळे
कुणी म्हणे फळ
पडते खाली
प्रेम करा रे
सांगत कोणी
परक्यांवर नित
द्वेष ओकतो
कुणी मंदिरे
बांधत फिरतो
कुणी कोरतो
सुंदर लेणी
कुणी जन्मतो
मुर्तीभंजक
अंती त्याचे
बनते थडगे
कुणी घडवतो
तगडे सैनिक
कुणी प्रसवती
गुणी खेकडे
ज्याच्या मागे
उभे घोळके
त्याची सत्ता
तत्व नागडे
कुणी शोधले
सोने मोती
कुणी राहिले
खोदत माती
कुणी शोधली
लिपी लाघवी
फुगवीत बसले
पोकळ छाती
कुरघोडी कर
कुरघोडी कर
कुणी शहाणा
सांगत सुटला
कुणी निघाला
जिंकत पृथ्वी
कुणी म्हणाले
माया सगळी
कुणी त्यागुनी
संसाराला
वनात गेले
स्वत:स शोधत
संसाराच्या
संसर्गावर
कुठे मिळाले
कुणास औषध
कुणी म्हणाले
जे आहे ते
सगळे सगळे
करुया सोपे
कुणी शोधला
पैसाअडका
कुणी बदलले
घरटे खोपे
मंत्र गळाले
तंत्र उगवले
युग अवतरले
घड्याळवेडे
यंत्रयुगाचा
मुखडा भोळा
विज्ञानाचे
त्यावर मुस्के
अणू मिळाला
अन् अजरामर
अणुयुद्धाचा
विध्वंसक ज्वर
कधी न शमला
जात, धर्म अन्
वर्णद्वेष या
पृथ्वीवरला
पृथ्वीचा रस
काढत चाखत
विकास भोगत
आला मानव
प्रयोग तिकडे
होतो आहे
चंद्र मंगळा
आता सावध
मुठीत आले
विश्व कुणाच्या
विश्व कुणाचे
विखरुन गेले
जितक्या भिंती
पाडुन झाल्या
नव्या तेवढ्या
उठल्या भिंती
प्रयोग आहे
सुरू निरंतर
कसे कुणाला
करू निरूत्तर
सरहद्दींचा
घेउन ठेका
कुणी होतसे
मानवतस्कर
माज यशाचा
करू साजरा
यातच आहे
जनहित मानू
शोधत राहू
सोडत राहू
शत्रुंवर नित
कैक विषाणू
हेच संक्रमण
पिढीत पुढच्या
पसरण्यास
वाढवूत शाळा
भविष्य मोठे
सुंदर आहे
फक्त अनुभवा
प्रयोगशाळा!
राजीव मासरूळकर
Friday, 6 March 2020
बा करोना... ये, तुझं स्वागत आहे!
बा, करोना... ये, तुझं स्वागत आहे!
अगदी वेळेवर आलास बघ तू
तुझ्या वाटेला डोळे लावूनच तर बसलो आहोत आम्ही जन्मापासून
ये, तुझ्या स्वागतास हा अखंड हिंदुस्थान सज्ज आहे!
तुझा सामना आता आमच्याशी आहे!
(तशी अगदी संपूर्ण मानवजातच सज्ज आहे म्हणा...
पण मानवजात वगैरे सगळं फोल असतं रे..)
ऑ... विचारात पडलास?
स्वागत वगैरे का म्हणून..?
सोड रे... तुला घाबरण्याइतकं डरपोक थोडंच आहे आमचं रक्त!
(समाजमाध्यमांवर तुझा नायनाट करण्यासाठी
सूचवले जात असलेले जालीम विनोदी उपाय आठवून बघ)
कळ्ळंकाय...?
चिननं दाखवलंय तुझं अक्राळविक्राळ रूप सबंध जगाला.
सतत फुत्कारत, आग ओकत राहणारा एवढामोठा ड्रॅगन
तुला बघताच चळाचळा कापायला लागला हे म्हायती झालंय शेंबड्या पोरांनाही
म्हणून आम्ही घाबरून जावं असं काय नवीन जीवघेणं वैशिष्ट्य आहे तुझ्यात... सांग तरी!
नुकतीच कोवळी लुसलुशीत जावळं दिसू लागलेल्या डोक्याखाली असलेल्या
तुझ्या निष्पाप तुकतुकीत कपाळावर
प्रश्नार्थक आठ्यांचं वाढत चाललेलं जंगल बघून
मला किती असुरी आनंद होतोय तुला कसं सांगू...!
घाबरू नकोस... तुझी उत्सुकता तुटेपर्यंत ताणणार नाही मी ...
ये इकडे, जरा बस, पाणी पी, थोडा हस
लाजू नकोस, नाहीय लस
दुरून आलास, थकुनभागून
पाय पसर... देऊ दाबून....?
हां... किती शहाण्यासारखा वागतोयस आता!
चल, डोळे मिट बघू हळुहळु
तुझ्या सोनेरी जावळांतून माझी करामती बोटं फिरवत
तुला काही गोष्टी सांगेन म्हणतो मी
पण नुकताच जन्मलेला तू...
तुला सांगावं की सांगू नये हा प्रश्न
तुझ्यामुळे सध्या सुरू असलेल्या हाहा:कारापेक्षा
अधिक तिव्रतेने सतावतोय मला...
खूप लहान आहेस रे तू अद्याप,
कळेल तुला हळुहळु
खरं सांगू...?
तुझ्या येण्याचं कुठलंच अप्रुप नाहीये आम्हाला
का म्हणून विचारतोयस म्हणून
इच्छा नसतानाही सांगतोय तुला... नीट ऐक
या भूमीवर आम्ही जन्मलो तेव्हापासूनच
माणसाळवून ठेवलेयत आम्ही HIV सारखे महाभयंकर व्हायरस
बा करोना, HIV तर आमच्याही आधीचा
आमच्या बापजाद्यांच्याही आधीचा
मूळपुरूषासारखाच जणु...
तूही त्याचाच वंशज असावास
म्हणजे दूरचा का होईना .. आमचा नातलगच!
त्यानंतर अनेक आक्रमक व्हायरस आले क्रमाक्रमाने
....देवी, गोवर,पोलिओ, चिकुनगुनिया, इबोला वगैरे वगैरे
आम्ही लढलो त्यांच्याशी निकरानं
या संघर्षात आमच्या असंख्य पिढ्या कामी आल्या
काही आम्ही संपवले,
काही आम्हाला हरवून स्थिरावले इकडेच आमचेच होऊन...
हो हो हो... अरे थांब जरा!
झाली लगेच लागन तुलाही?
इतिहास ऐकल्याबरोबर लगेच लागलास फुगवायला छाती
56 इंचांपर्यंत...
याच भितीमुळे तर सांगणार नव्हतो ना मी तुला हे...
इतिहास हा कडुगोड परिणाम दाखवणारा एक व्हायरसच आहे का
यावर सध्या संशोधन सुरू आहे आमच्याकडे
कधी महिन्याला, कधी आठवड्याला, कधी दररोजच
प्रयोग करीत असतो आम्ही
इतिहास उगाळून रक्तपात घडतो का या विषयीचे
रक्तपात घडतोच पण त्याच्यामागे इतिहास हाच व्हायरस आहे
हे काही केल्या सिद्ध होऊ शकलेलं नाही..
तुला त्याची लागन होऊ नये म्हणून मी काळजी घेतोय... बस्स एवढंच!
(फितुरीचाही मोठा इतिहास आहे बरं का आमच्याकडे
मी ही एक फितुरंच... असं म्हणतोस?
असू दे असू दे.. मला नाही पर्वा त्याची!)
तसं बस एवढंच नाही, बरंच काही सांगायचंय तुला
विचारायचंही आहे...
मला सांग, जन्माला आल्यापासून
किती माणसांचे जीव घेतले आहेस तू पृथ्वीवर?
पाचपंचवीस हजार ना?
तुला माहितीये दररोज अपघाताने जगभरात किती लोक मरताहेत?
कँसरने दररोज जीव गमावणारांचा आकडा माहितीये तुला?
हृदयविकाराने किती जण जग सोडून जातात दररोज?
अजून किती जीवघेणे आजार सांगू?
खायला अन्न नाही म्हणून तळमळून कितींचा प्राण जातो?
आणखी एक,
केवळ आमच्या एकट्या अखंड वगैरे भारतात आत्महत्या नावाचा एक महाभयंकर विषाणू
दरमहा किती गळ्यांना फास लावतो माहितीये? दरमहा सुमारे 1000....
तू आल्यापासून किती न् काय दिवे लावलेस?
तू गर्भगळित व्हावंस म्हणून काही मी हे सांगत नाहीये
अभ्यास कर. पुढच्या वेळी येशील तेव्हा प्रचंड तयारीनिशी ये..
कळ्ळंकाय ..?
महत्वाचा विषय बाजुलाच राहिला बघ...
धर्म नावाचा एक अत्यंत जटिल विषाणू
संपूर्ण पृथ्वीभर पसरलाय
तू येण्याच्या खूप खूप आधी
आमच्या जन्मानंतर लगेचच....
माणसाने धर्म जन्माला घातला कि धर्माने माणूस
इतिहास धर्मातून आला की इतिहासातून धर्म
या वादात पडण्यात बिल्कुल स्वारस्य नाही आम्हाला
आमचा रस धर्म-जातींच्या कडेकोट बंदोबस्तात आहे
अनेक रूपांत प्रकटलेला, अनेक शाखांत विभागलेला
हा महाजटिल विषाणू दररोज
शेकडोच्या संख्येत आमचं रसग्रहण करतो
आणि आम्ही त्याचं रसग्रहण करतो!
सत्य, अहिंसा, प्रेम, कर्म, दया, दु:खमुक्ती, मानवता इत्यादि
प्राणतत्वांतून जन्मलेला असूनही
तो दररोज त्यांचाच प्राण कंठाशी आणत सुटलेला आहे...
आजघडीला तो समाजमाध्यमांवरील अफाट अतिरंजित
असंबद्ध माहितीवर पोसला जात असून
तंत्रज्ञान मुठीत घेऊन फिरणा-या मेंदूमेंदूत
द्वेष पसरवण्याचं, बुद्धीभेद करण्याचं,
दंगली घडवण्याचं कर्तव्य बेमालुमपणे निभावताना दिसतेय...
गेल्या शतकादोनशतकातला दंगलींचा , छुप्या-उघड धर्मयुद्धांचा इतिहास अभ्यासून बघ
विषाणुंच्या धर्मांत जन्मल्याचा तुझा अहंगंड गळून पडेल कदाचित...
नेपाळमध्ये भूकंप होतो, देश मदतीला धावतो
जपानमध्ये त्सुनामी येते, देश मदतीला धावतो
चीनमध्ये करोना येतो, देश मदतीला धावतो
ऑस्ट्रेलियात जंगल पेटतं, आम्ही कळवळून उठतो
प्रसंगी पाकिस्तानात नैसर्गिक, आरोग्यविषयक संकट उद्भवलं तरी आम्ही मदतीला धावून जातोच
पण देशातल्या भिन्नधर्मी, भिन्नजातीयांसोबत उसळणा-या दंगलींचं काय?
महिलांवर होणा-या अत्याचाराचं काय?
देशादेशांत सुरू असलेल्या धर्मयुद्धांचं काय....?
या सगळ्याला सरावलो आहोत रे आम्ही
असे असंख्य महाभयंकर विषाणू आमच्या नित्य जगण्याचा भाग झालेले आहेत,
काही खेळणी म्हणून खेळण्याचा भाग झालेले आहेत...
आम्ही या जुन्या खेळातंच आत्मघात करत संपून जाणार आहोत
हे ठरलेलं आहे..
मग तुझ्या येण्याचं कौतुक ते कितीसं असणार?
तू नवा आहेस इतकंच काय ते नवल
नव्याचे नऊ दिवस म्हणून उदोउदो होईल फारतर
पाहुणा म्हणून काही दिवस रहा,
मग आमचाच होऊन जा
तशी तू येणार असल्याची भविष्यवाणी
आधीच लिहून ठेवली गेलेली आहे आमच्याकडे
फक्त तू काही चमत्कार घडवून आणतोस का
याकडे लक्ष राहिल रे आमचं
तू आलास याचा थोडा आनंद आहेच
आणि हे स्वागतही त्यामुळेच!
(खरं सांगू का?
अजून एक भविष्यवाणी आहे
एका घासात पृथ्वी गिळंकृत करणा-या महाभयावह व्हायरसची..
त्यासाठीच तर अधीर झालेलो आहोत ना आम्ही?
त्यादिशेनंच तर वाटचाल सुरूय बघ.
पण तू आला आहेस तर असू दे... )
चल, मी जरा पाहुणचाराचं बघतो!

Subscribe to:
Posts (Atom)