सखे आग आहे
तुझी देहबोली
गुलाबाची लाली
ओठांवर ।।
नाकावर राग
देह जसा नाग
अत्तराची बाग
सदाफुली ।।
तुझे शब्द येती
जणू सूर येती
मला दूर नेती
स्वप्नदेशी ।।
तुझ्या वागण्याला
रेखीवता अशी
पडतसे फशी
पाहणारा ।।
तुझे गुण गाणे
नव्हे माझा हेतू
भेटण्यास ये तू
सांजवेळी ।।
- राजीव मासरूळकर
दि.18.10.2011
भेटण्यास ये तू सांज वेळी !
ReplyDeleteव्वा खूप छान.
अभंगालाही शृंगाराचे वावडे नाही हे पटलंय.
नक्कीच, सर. आपले हार्दिक आभार!
ReplyDelete