**हल्ली**
घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्याला दडे रोज हल्ली !
फितूरी चहाडी मुजोरी लबाडी
शिकाया मिळे हे धडे रोज हल्ली !
सुखाचे कुठे येथ गर्भार होणे ?
तुटे मायचे आतडे रोज हल्ली !
कधी ना कुणाला कटू बोलला तो
स्वतःला शिवी हासडे रोज हल्ली !
तुझ्या लाजण्याला कुठे अर्थ आता ?
तुला पाहतो ना गडे (नागडे) रोज हल्ली !
कशाला हवे ईश्वरी पावसाळे ?
सरी आसवांच्या पडे रोज हल्ली !
"विकासातुनी जा लयाला, मनूजा"
थरारे धरा , ओरडे रोज हल्ली !
- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा
दि . ११.०९.२०१२
रात्री ९.३० वाजता
फारच छान आहेत सरजी कविता आणि ब्लॉग
ReplyDeleteअभिमान आहे आम्हाला आमचे साहेब कवी व गझलकार असल्याचा
फारच छान आहेत सरजी कविता आणि ब्लॉग
ReplyDeleteअभिमान आहे आम्हाला आमचे साहेब कवी व गझलकार असल्याचा
धन्यवाद साबळे सर.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete