तुझी आठवण दाट झाली
सावल्या लांबल्या अन् झुळूकसुद्धा लाट झाली
संध्याकाळ होताच तुझी आठवण दाट झाली
कित्ती सुखद होती ती ऊब तुझ्या गर्भामधली
वात्सल्याची नाळ तुटली ....... जिंदगी हाट झाली
कितीक रस्ते चालत.... टाळत, वळणांवरुन वळलो
अन् आता.... उभ्याउभ्या जळणे माझी वाट झाली
आत्ता तर आला होता चंद्र, माझ्यासमोर वर
अन् बघता बघता कशी काय खुळी पहाट झाली ?
फार ठरवुन एकदा बसलोच स्वत:स रेखाटत
हजारदा आवडलं, लाखदा काटछाट झाली
आयुष्याची वाकळ शब्दन् शब्द उसवत गेलो
लोक फक्त हेच म्हणाले, कविता भन्नाट झाली !
~ राजीव मासरूळकर
17/01/2014
18:30

No comments:
Post a Comment